पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने;
हलकेच जाग मज आली,
दुःखाच्या मंद सुराने.
डोळयात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती;
दुःखाचा उतरला पारा…..
या नितळ उतरणीवरती.
पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला?
तार्यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला…
संदिग्ध ढगांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा;
माझ्याच किनार्यावरती
लाटांचा आज पहारा!
0 comments:
Post a Comment