Searching...
Thursday, 31 August 2017

मोर




घनकंप
मयूरा
तुला इशारा
खोल पिसारा
प्राण आडवा पडे
तू वळशील माझ्याकडे ?
घनसंथ
मयूरा
धूळ दरारा
कुठे पुकारा
तीक्ष्ण नखांची दीप्ती
गीतांतून गळते माती....
घननीळ
मयूरा
रंग फकिरा
तुला पहारा ?
कातडे वाळत्या वेळी
ते भीषण उन कपाळी.
घनदंग
मयूरा
नको शहारा
हलका वारा
बिंदीत चंद्र थरथरते
ती वस्त्र कुठे पालटते..


0 comments:

Post a Comment

 
Back to top!