Searching...
Thursday, 31 August 2017

गाणे




डोंगरी दिसे कल्लोळ
पलिकडले सर्व निवांतं
निजतात कसे हे लोकं
सरणाच्या खाली शांतं


मी उदास बसलो आहे
या एकट ओढयापाशी
परतीच्या गाई मजला
कां दिसती आज उपाशी ?


मज वाटे येतिल मागुन
गहिवरले हंबर काही
साथीच्या गावामध्ये
की कुणीच उरले नाही ?


कापराप्रमाणे उडाली
हृदयावर सजली ओळ
झुळझुळत्या अंगालाही
कां आतुन आली भोवळ ?


सावल्या तुझ्यावर पडती
राखता उन्हाची गाणी
कां तहान विझवत नाही
हे तीर्थबळाचे पाणी ?


जरतारी दिसता दिसता
हा मेघ अचानक भगवा
पाण्यावर तरणार्या ही
पाण्यातच बुडती नावा?


मी आठवतो ती राने
भटकल्या दिशांचे छंद
छातीचे लक्तर गळले
चोळीचे तुटता बंध ...


कोरिले ललाटी चक्र
तरि आडोशाला आपण
अंधार जरासा उचलुन
हातांची केली गुंफण.


हे एक पाखरू म्हणजे
जर चार फुलांची माती
गाताना मी उजळू का
या सर्व दिव्यांच्या वाती ?



0 comments:

Post a Comment

 
Back to top!