परतुनि कधि येशी अंत नाही तमाला
तमभर घर माझे चंद्र नाही उशाला
तरुवीण घन कैसे काजवे शुष्क डोळी
पदर भिजुनी ओला संचिताच्या कपाळी
घडिभर स्वर देतो कोण माझ्या स्वराला?
घुमट गळूनि येतो देऊळाच्या तळाला
सरसर फिरतो हा वृक्षशाखांत वैरी
पळपळ पणतीची ज्योत लागे जिव्हारी
कणभर उरलेले रूप माझे उरी घे
मधुतर जळवंती हात माझे करी घे
तनुभर जमलेली रात्र घेना मिठीला
क्षणभर जवळी ये झाकुनी दे दिठीला
0 comments:
Post a Comment