किती अनावर
अंधार डहाळी झुलते हृदयापाशी
एकेक कळी श्वासांनी उमलत जाते
विखुरतो कोवळा मरणगंध हलक्याने
माधवी रात्र स्मरणाशी निथळत येते....
तू दूर नदीच्या काठाशी एकाकी
मी केशरज्योती पाण्यावर पाठवते
आतल्या धगीने उजळत नवखे काही रे
जसे वाहत्या शब्दांवर थरथरते
तू आसक्तीची गुणगुणताना ओळ
हे किती अनावर दु:खाचे खळखळ्णे
होकार नकारापल्याड बघ ना आता
आपुल्या चांदणी नात्याचे सळसळणे...!
कवितासंग्रह: निरंजन
0 comments:
Post a Comment