Searching...
Thursday, 31 August 2017

मंदिरे सुनी सुनी



मंदिरे सुनी सुनी
कुठे न दीपकाजवा
मेघवाहि श्रावणात
ये सुगंधी गारवा


रात्र सूर पेरुनी
अशी ह्ळूहळू भरे
समोरच्या धुक्यातली
उठून चालली घरे


गळ्यात शब्द गोठले
अशांतता दिसे घनी
दु:ख बांधूनी असे
क्षितिज झाकिले कुणी?


एकदाच व्याकुळा
प्रतिध्वनीत हाक दे
देह कोसळून हा
नदीत मुक्त वाहू दे!



0 comments:

Post a Comment

 
Back to top!