Searching...
Thursday 31 August 2017

फुंकर




घर थकलेले सन्यासी
हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळयामधले
नक्षत्र मला आठवते…
ती नव्हती संध्या मधुरा
रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी
आभाळ घसरले होते…
पक्षांची घरटी होती,
ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळी मागे
असतेच झर्‍याचे पाणी !
मी भीऊन अंधाराला
अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे
त्या दरीतली वनराई…
ते बाळवाटिचे रडणे
तळहात कावळे खुडती
आईच्या माहेराहून
कुणी वेडी आली होती....
भीतीने बावरलेल्या
शब्दांच्या संधाकाळी
मी विसरून मोजत बसतो
कवितेच्या माझ्या ओळी!
त्या दचकून हसल्या सखवा
ताऱयांची धूळ अनावर
आईने पणतीवरती  मग
हळूच घातली फुंकर…..



0 comments:

Post a Comment

 
Back to top!