Searching...
Thursday 31 August 2017

आई १




ती गेली तेव्हा रिमझिम
पाउस निनादत होता
मेघात मिसळली किरणे
हा सुर्य सोडवित होता
तशी सांज आमुच्या दारी
येउन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा
अर्थातून शब्द वगळता
ती आई होती म्हणुनी
घनव्याकुळ मीही रडलो
त्या वेळी वारा सावध
पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला
संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा
कंदील एकटा होता
हे रक्त वाढतानाही
मज आता गहिवर नाही;
वस्त्रात द्रौपदीच्याही
तो कृष्ण नागडा होता



0 comments:

Post a Comment

 
Back to top!