Searching...
Saturday, 26 August 2017

खेड्यामधले घर कौलारू



आज अचानक एकाएकी
मानस लागे तेथे विहरू
खेड्यामधले घर कौलारू

पूर्वदिशेला नदी वाहते
त्यात बालपण वहात येते
उंबरठ्याशी येउन मिळते
यौवन लागे उगा बावरू

माहेराची प्रेमळ माती
त्या मातीतुन पिकते प्रीती
कणसावरती माणिकमोती
तिथे भिरभिरे स्मृती पाखरू

आयुष्याच्या पाउलवाटा
किती तुडविल्या येता जाता
परि आईची अठवण येता
मनी वादळे होती सुरू



2 comments:

  1. ही कविता कोणी लिहिली आहे. गदिमांनी अशीच कविता १९५४ साली आहे.

    ReplyDelete

 
Back to top!