Searching...
Tuesday 29 August 2017

उगवत असलेल्या सूर्यास




उदयगिरिशिरीं या त्वत्तुरंगीं खुरांहीं
तुडवुनि उडवीली धूलि ही जैशि कांहीं :-
द्युति बघुनि अशी ती चित्त माझें रमून,
दिनकर ! मज बोधी तूज गाया नमून ! ॥१॥
नव सुरुचिर वल्ली या हिमस्नात यांनीं,
नव रुचिर लतांनीं या हिमालंकृतांनीं,
स्मितसम सुमनांनीं पूजितां तूज आतां,
फिरुनि फिरुनि भास्वन् ! वन्दितों तून गातां ॥२॥
कवळुनि करजालें भूमिलागूनि, लाल
विलसितरुचिभासें फेंकितां तूं गुलाल
विकसिततरुमालाकेशपंक्तींत तीचे,
स्तवुनि फिरुनि तूतें वन्दितों मी मरीचे ! ॥३॥
अनुकरण करीं मी गाउनी या खगांचें,
तदिव सुमनतांचें वन्दुनी या लतांचें,
अनुसरत असें मी हांसुनी पद्मिनीस,
शरण तुजसि आलों मी असा नम्र दास ! ॥४॥



0 comments:

Post a Comment

 
Back to top!