Searching...
Sunday 27 August 2017

समईच्या शुभ्र कळ्या



समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते;
केसातच फुललेली जाई पायांशी पडते!
भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे;
मागे मागे राहिलेले माझे माहेरे बापुडे!
साचणा-या आसवांना पेंग येते चांदणीची;
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची!
थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये;
पदराच्या किनारीला शिवूं शिवूं ऊन गं ये
हसशील, हास मला, मला हसूही सोसेना;
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा!
गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगाऱ्याची बोटे
वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते;
उगा बावरते मन भरू येताना केसर
अशा वेळेची, वाटते, अंगावर घ्यावी सर;
डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे
असे काहीसे वाटते याला कसली गं नावे?’

0 comments:

Post a Comment

 
Back to top!