Searching...
Monday 28 August 2017

अंदाज आरशाचा



वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे


रोज अत्यचार होतो आरश्यावरती आता
आरश्याला भावलेली माणसे गेली कुठे


अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा ....!!


काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा


अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा....!!


जखमा कश्या सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा


अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा ....!!


माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही
दाही दिशा कशाच्या हा पिंजरा असावा


अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा

बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा ....!!


0 comments:

Post a Comment

 
Back to top!