त्रिवेणी
१. दुःख
कसल्या दुःखाने
सुचते हे गाणे
गळतात पाने
झाडांचीही?
वेळा जरी साधी
सूर्य ढळलेला
मनी उरलेला
सांजपणा.
उठा कावळ्यांनो
करा वाटचाल
कधी उजाडेल
देव जाणे!
२. जाग
उगवले आहे
तुळशीचे रोप
तशी आपोआप
जाग आली
अश्रुसारखेही
नाही माझे डोळे
हळदीने पोळे
अंग माझे !
पंख नाही तुला
पाय नाही मला
पाऊस हा आला
वळिवाचा...
३. धुराळा
दिशांचा धुराळा
उताराला खाली
क्षितिजांची झाली
दृष्टी माझी
शब्द झाले वाटा
अर्थ झालं काठी
आंधळ्याच्या हाती
पायपण!
0 comments:
Post a Comment