गंगे गंगे
जान्हवी गे
माझे पाय ओढून घे
तुझ्या खोल
डोहामधली
एक भूल मला दे.
गंगे गंगे
जान्हवी गे
माझ्या कळ्या विखरून टाक
पाठीमागे
सूर्य गेला
तरी नाही माझी हाक.
गंगे गंगे
जान्हवी गे
काठावरचा वारा
हाडांनाही
पिळून घेता
नको डोळी धारा.
गंगे गंगे
जान्हवी गे
पूर येता कसे?
पाण्यामध्ये
निजती का
पाण्यातले मासे?
गंगे गंगे
जान्हवी गे
पैलतिरी काय
उतू गेल्या
दुधावरची
मला नको साय!
0 comments:
Post a Comment