काही धारा माझ्या पोरी
काही तुझ्या गारा
पावसाळी आभाळात
एखादाच तारा
काही प्रहरांचे मोती
काही तुझे गाणे
बाहुलीच्या खेळातही
रडू रडू जाणे....
एक दार माझे पोरी
तुझी दोन दारे
बकुळीच्या गुंफेतले
पहाटेचे वारे....
एक दुःख तुझे पोरी
मला नाही व्यथा
माऊलीच्या मागे गेली
अंगाईची कथा....
चिंब तुझे अंग पोरी
मला सजू आले
बाभळीच्या काट्यावरी
रक्त वाळलेले
0 comments:
Post a Comment