Searching...
Friday, 1 September 2017

नर्तकी




पुरातून येती तुझे पाय ओले
किती अंतराळे मधे मोकळी
महाद्वार जेथे तुझी लाज प्याया
उभ्या कुंपणाने तिथे बाभळी
जिथे पोचती ना कधी शब्द माझे
असे नृत्यगारातले चांदणे
दरीच्या तळाशी जसा सूर जावा
तसा देह घासून छन्दावणे
विराटात भक्ती तमाचा दिलासा
गळे मृत्यु दुक्खातुनी सारखा
तुझा नृत्यागांधार वेचावयाला
रडे मंद धारेत की पारवा …
दूरात माझी ढळे कृष्ण छाया
जसा कर्ण कुन्तीत सामावला
तुझ्या तीक्ष्ण हातांत माझी अहंता
तिथे अंत प्रारंभ गे कोठला?


0 comments:

Post a Comment

 
Back to top!