बाहुलीचे न्हाण कधी
खरे मानू नये
साडीचोळी अपुली ग
सांभाळावी बये.
अंबारीचा हत्ती नसे,
अंबराचा स्वामी
लक्ष्मणाची रेघ आली,
उर्मिलेच्या कामी
अनसूयेलाही बाई,
कधी होतो जाच
देवदत्त वृक्षापुढे,
मांडतांना पेच
शरीराचे देणे घेणे,
त्याचे द्यावे दान
पायाखाली फुले येतां,
उपटावे तण
देवाच्याही गावामध्ये,
वेताळाचा पार
घुबडाच्या डोळ्यालाही,
कारूण्याची धार
हडळीचा दिवा तेथे,
फुंकू नये त्याला
असे जाता जाता भेटे,
गंगा शंकराला
0 comments:
Post a Comment