Searching...
Friday 1 September 2017

प्रपंच



दीप पाजळले नेत्री
गात्री सजविली शेज
रंग वादळासारखे
आले भरून क्षितिज .


माझा आंधळा प्रपंच
झाडे श्रावणासारखी
अशा सज्जवेळी आली
मला न्यावया पालखी....


पुसा बाहुलीचे डोळे
वेचा आभाळात मोती
कुणा पायांच्या नादाने
दिशा कोसळून जाती!


करा अंगण मोकळे
त्यात विझू नये दिवा
एका झुळुकीने माझा
जन्म मातीत मिळावा!



0 comments:

Post a Comment

 
Back to top!